शालु हिरवा पांचू नि मरवा SHALU HIRAWA PAANCHU NI MARWA

शालु हिरवा पांचू नि मरवा ,वेणी तीपेडी घाला
साजनी बाई येणार साजन माझा ,गोरया भाळी चढवा जाळी
नवरत्नांची माला ,साजनी बाई येणार साजन माझा

चूल बोळकी इवली इवली ,भतुकलीचाखेळ ग
लुतुपुटीचा संसाराची ,संपत आली वेळ ग
रेशिम धागे ओढ़िती मागे ,व्याकुळ जीव हा माझा
साजनी बाई येणार साजन माझा

सूर गुंफिते सनई येथें घड़े चौघडा दारी
वाजत गाजत मिरवत येईल ,घोड्यावरूनी  स्वारी
मी वरमाला घालीन त्याला मुहर्त जवळी आला
साजनी बाई येणार साजन माझा

मंगलवेळी मंगलकाळी ,डोळ्या कां ग पाणी
साजन माझा हा पतिराजा ,मी तर त्याची राणी
अंगावरच्या शेलारीला ,बांधुन त्याचा शेला 
साजनी बाई येणार साजन माझा

Lyrics -शांता शेळके SHANTA SHELAKE
Music -मानस मुखर्जी MANAS MUKHARJI
Singer -उषा मंगेशकर USHA MANGESHAKAR
Movie / Natak / Album -बन्याबापु  BANYABAPUNo comments:

Post a Comment