पवन बोले सन सन सन PAWAN BOLE SAN SAN SAN

पवन बोले सन सन सन ,हिरवी पाने हिरवे गाने
बोल भ्रमरा बोल ,मनातले बोल
पुढे न पड़े पाऊल अड़े ,जाईल माझा तोल

रिमझिम  वर्षारानी आली ,काया माझी मोहरली
पानोपानी रेषा ओली ओली ,ओलावली वाया गेली 
भूल पडे माझी मला ,झाले रे अबोल

आभासाच्या मागे मागे जावे ,वेडे खुळे मन धावे
मृगजळी पुन्हा पुन्हा न्हावे ,अनवाणी पुन्हा व्हावे
जन्मभरी व्यथा उरी ,मनाहुनी खोल  

Lyrics -शांता शेळके SHANTA SHELAKE
Music -मानस मुखर्जी  MANAS MUKHARJI
Singer -उषा मंगेशकर USHA MANGESHAKAR
Movie / Natak / Album -बन्याबापू BANYABAPU

No comments:

Post a Comment