सांज रंग ओले ओले SAANJ RANG OLE OLE

सांज रंग  ओले ओले,आभाळही नीले झाले
रात भुले चांदण्याला,मन माझे दिले तुला

गत जन्माचे ग नाते राणी तुझे माझे होते
आज कळे मला ते,आज कळे तुला ते 
चांद म्हणुन खाली झुकला,वाट रोजची ग चुकला
चांद रातीला ग भुलला,मन माझे दिले तुला
सांज रंग  ओले ओले.……

भोळी विसरली अंग,आला चांदण्यांचा रंग
माझे पालटले जग,उरे तगमग
भरोनिया येतो उर,एक सावळी हुरहुर
मीच विचारते मला,मन का रे दिले तुला 
सांज रंग  ओले ओले.……

चंद्रमोहिणी ही रात,धुंद भोवती एकांत
वीरे चांदणे पाण्यात,तसा तुझ्या मी गाण्यात
चांद उतरुणी आला,चांद स्वये रात झाला
भेद अवघा हा संपला,मन माझे दिले तुला 
सांज रंग  ओले ओले.……

Singer -उषा मंगेशकर  USHA MANGESHKAR