मन वेडे रमतच नाही MAN WEDE RAMATACH NAHI


मन वेडे रमतच नाही,मज कृष्ण भेटवा बाई
कशी चैन जिवाला नाही, मज कृष्ण भेटवा बाई 

किती वणवण शोधुनि आले,चालुन चालुन पायही थकले
वृंदावनही हरवून गेले रे दर्शन सखया देई 
मज कृष्ण भेटवा बाई

लपला कुठे ग श्री वनमाळी,मज छळतो हा सांज सकाळी
भुलविते जीवामंजुळ मुरली,जशी नागिन दशंत राही  
मज कृष्ण भेटवा बाई

हा जन्म असो शेवटला,हा श्वासही आता थकला शिणला
ना तरी लोटुन दे ब्रिजबाला,हा देहचा यमुना डोही
मज कृष्ण भेटवा बाई


Lyrics -  शिरीष  पाल    SHIRISH PAI.
Music -  मीना मंगेशकर   MINA MANGESHKAR
Singer -  उषा मंगेशकर     USHA  MANGESHKAR
Movie / Natak / Album -  कराव तस भराव    KARAV TAS BHARAV

2 comments:

  1. हे गाणे ऐकायचे आहे. आहे का कुणाकडे ? Please!

    ReplyDelete
  2. हे गाणे ऐकायचे आहे. आहे का कुणाकडे ? Please!

    ReplyDelete