इथे मी हसावे ETHE MI HASAVE

इथे मी हसावे तिथे तू रुसावे
नको रे ,नको रे,नको रे प्रिया  

खुळी प्रीत माझी तुला वाहिली
तुझी मूर्त डोळ्यात मी पाहिली
मी पाहिली

नको हा बहाना,अशी दुर जा ना
नको रे ,नको रे,नको रे प्रिया  

तुझ्या धुंद श्वासात न्हाली कळी
तुझा स्पर्श होता फुले पाकळी
फुले पाकळी

मुखी गोड भाषा अशी ही निराशा
नको रे ,नको रे,नको रे प्रिया  

Singer -उषा मंगेशकर,रविंद्र USHA MANGESHKAR,RAVINDRA