पाण्याहुन सांजवेळी PANYAHUN SANJWELI

पाण्याहुन सांजवेळी,जात होते घरी
अडवून वाट माझी,उभा राहे हरी

मनात मी बावरले,कशीबशी सावरले
अचानक तोच हाय,कोसळल्या सरी

आभाळात ओले रंग,चिंबचिंब माझे अंग
काय उपयोग आता,सावरून तरी

पड़े अनोळखी भूल,फुलले मी जसे फूल 
बासरीचा माझ्या,झाले प्राणभरी

काही बोलले मी नाही,वितळल्या  दिशा दाही 
चांदण्यांचा राजहंस,धरिला मी उरी
Lyrics -मंगेश पाडगांवकर   MANGESH PADGAWKAR
Music -श्रीनिवास खळे SHRINIWAS KHALE
Singer -उषा मंगेशकर USH MANGESHAKAR
Movie / Natak / Album -बन्याबापु  BANYABAPU

No comments:

Post a Comment