भावभक्तिने पूजिते विश्वनाथा BHAV BHAKTINE PUJITE VISHWNATHA

भावभक्तिने पूजिते विश्वनाथा
मन रंगले रंगले गीत गाता
भावभक्तिने पूजिते विश्वनाथा

तुझ्या मंदिरी येऊनी प्रात:काली
मूर्ति पाहता लोचने तृप्त झाली
लीन होउनि ठेविते पायी माथा

पुजनासी मी माझिया अंगणात
वेचूनि फुले अनिली पारिजात
गंध चंदनी लाविते भाळी  आता

अर्पिता तुला केशरी दुध वाटी
सुखे साठविते रे तुझे नाम ओठी
कंठी सुर दे रे माझिया दीनानाथ

Lyrics -अण्णा जोशी
Music -अण्णा जोशी
Singer -उषा मंगेशकरNo comments:

Post a Comment