हा माझा मार्ग एकला HA MAZA MARG EKLA

हा माझा मार्ग एकला
शिणलो तरिही चालणे मला

दिसले सुख तो लपले फिरुनी
उरले नशिबी झुरणे दुरुनी
बघता बघता खेळ संपला

सरले रडणे उरले हसणे
भवती रचितो भलती व्यसने
विझवू बघतो जाळ आतला

जगतो अजुनी जगणे म्हणूनी
जपतो जखमा हृदयी हसूनी
छळते अजुनी स्वप्न ते मला

Lyrics -शांता शेळके SHANTA SHELKE
Music - सुधीर फडके SUDHIR PHADKE
Singer -सुधीर फडके SUDHIR PHADKE
Movie / Natak / Album - हा माझा मार्ग एकला (१९६२) HA MAZA MARG EKLA

No comments:

Post a Comment