ईश्वराचा ठाव कधी ESHWRACHA THAV KADHI

ईश्वराचा ठाव कधी
एके ठायी सापडेना
शोधणारा शोध घेतो
मार्ग त्यासी गवसेना !

मूर्ती स्वत: निर्मुनिया
रूप सगुन पूजितो
येता संकटेही मार्गी
त्याचा विसर पडेना !

पूजितो त्या परमेशा
रीत वेगळी भक्तीची
अव्यक्ताची करी भक्ती
स्वये विभक्त असेना !


Lyrics -विमल कीर्ति महाजन  VIMALKIRTI MAHAJAN
Music- श्रीनिवास खळे SHRINIWAS KHALE
Singer -उषा मंगेशकर USHA MANGESHKAR
Movie / Natak / Album -कराव तस भराव KARAV TAS BHARAV

No comments:

Post a Comment