आला आला ग आला ग AALA AALA G AALA G

आला आला ग आला ग,माझा सांवरिया 
कशी सावरू माझी मला,ये फुलुनी फुलुनी 
क्षण सौख्याचा,मनी चांदणे घेई झुला 

सावळे रूप त्याचे,श्रावण मेघापरी 
भोळी खुली मी बाई,भुलुन फुलून गेले 
माझ्या नजरेची भाषा,अबोल भाषा 
कशी बाई सांगु सांगु त्याला ग

रविकिरणाचे तेज,चंद्राचे चांदणे  
शामरंगी  प्रीती त्याची,शामल शामल शोभे 
शतजन्मीचे नाते,अरूप नाते
मीरा अन राधा ग   

आला आला ग आला ग,माझा सांवरिया 
कशी सावरू माझी मला,ये फुलुनी फुलुनी

Lyrics -वसंत देशमुख VASANT DESHMUKH
Music -अनिल अरुण  ANIL ARUN
Singer -उषा  मंगेशकर USHA MANGESHKAR
Movie / Natak / Album -बन्याबापु  BANYABAPU

No comments:

Post a comment