हो देवा सुंदर जगामंदी का र मानूस घडविलास Deva sundar jaga mandi ka r manus ghadavilas

हो देवा सुंदर जगामंदी का र मानूस घडविलास Ho deva sundar jaga mandi ka r manus ghadavilas

हो देवा सुंदर जगामंदी का र मानूस घडविलास -२
घडविलास, घडविलास, का र मानूस घडविलास – २
हो भीक मागण्या भूक दिली
जन्म जाळण्या दुख दिले
घडविलास, घडविला, का र मानूस घडविलास – २

पांघराय न्हाय दिल, अंथराया काय दिल
चालायला पाय दिलं, पायाखाली काय दिलं
घडविलास, घडविला, का र मानूस घडविलास – २
हो देवा सुंदर जगामंदी का र मानूस घडविलास -२
घडविलास, घडविलास, दुखामध्ये बुडविलास

इटाळ टाळण्या टाळ दिलं, मजला चारीच भाळ दिलं
बहिरा होऊन कान दिलं, मिटायाला डोळ दिलं
हो देवा सुंदर जगामंदी का र मानूस घडविलास -२
घडविलास, घडविला, का र मानूस घडविलास – २

जगण्याची दैना केली मारण्याची चोरी केली
तहान दिली भूक दिली भिकेचे कटोरी दिली
घडविलास, घडविला, का र बाबा घडविलास – २

हो देवा सुंदर जगामंदी का र मानूस घडविलास -२
घडविलास, घडविलास, दुखामध्ये बुडविलास

ह्योच तुझा निवाडा आणि देवा तुझी रीत अशी
गरीबाची हार इथ, लबाडाची जीत अशी
हो देवा सुंदर जगामंदी का र मानूस घडविलास -२

हो देवा सुंदर जगामंदी का र मानूस घडविलास -२
घडविलास, घडविलास, का र मानूस घडविलास – २

Song: Deva Sunder jagamandi ka re manoos ghadavilaas
Movie: 72 Miles - Ek Pravas

No comments:

Post a Comment