मनी जे दाटले Mani je Datale tula paahuni



मनी जे दाटले तुला पाहुनी, सांगू कसे ?
हृदय शब्दांत ग आणावे कसे ? सांगू कसे ?

क्षणीं एकाच ओझरती जराशी दिसुनी गेलीस तू
तरी मी का उभा वळणावरती ते सांगू कसे ?

तुझ्या नजरेतली जादू, तुझ्या चालीतला डौल
कधी उतरेल ही भूल कशी ते सांगू कसे ?

सुखाची कळ दुखरी कशाला देऊन गेलीस तू ?
अनाहूत त्या क्षणांचे गूढ नाते सांगू कसे ?



No comments:

Post a Comment