चांदणे निळे टिपूर


चांदणे निळे टिपूर धुंद चहुकडे
ये मिठीत, ये दिठीत आज तू गडे

रसाळ या तुझ्या स्वरांत सौख्य साठले
एक फूल, स्पर्षभूल स्वप्‍न वाटले
दूर अंबरात चंद्रपाखरू उडे

भासतो प्रशांत मंद गारवा जरा
चारुशिल्प मोहवी मदीय अंतरा
जीव शालिनी असा तुझ्यावरी जडे

ऊरात गीत छेड तू सुरेल झंकृती
स्मृतीत राहू दे प्रिये सुरेख ही कृती
दंवात पारिजात शुभ्र घालतो सडे





No comments:

Post a Comment