झुंजुमुंजु पहाट झाली, कोंबड्यानं बांग दिली Zunju Munju Pahat Zaliझुंजुमुंजु पहाट झाली, कोंबड्यानं बांग दिली
पूर्वेला लाली आली, धरतीला जाग आली
भिरिभिरिती रानीवनी पाखरं
जिवाचा मैतर ढवळ्या न्‌ पवळ्या, शेताला घेऊन चालरं

धुकं पडलंया दाट, अंधारली ही वाट
घाटमाथ्यातुन वाहे पाट
सूर धरी ही मोट किरकिरं रं हाट
पाणी ओढ्याचं ओढीते लाट
नागमोडीनं चालली ही वाट रं
रानफुलांचा घमघमतो वास रं
जिवाचा मैतर ढवळ्या न्‌ पवळ्या, शेताला घेऊन चालरं

शेताचा बांधावर, बांधाच्या झाडावर, झाडाच्या फांदीवर
फांदीच्या पानावर, पानाच्या घरट्यात लपून बसलंय कोण रं
त्याला गुंड्यानं गोफण हाण रं
जिवाचा मैतर ढवळ्या न्‌ पवळ्या, शेताला घेऊन चालरं

दूर गेली नजर, डोईवरती पदर
घरची लक्षुमी शेतावर आली
तिनं आणली भाकर, खाऊन दिला ढेकर
गोडी न्यारीच चटणीला आली
तिच्या कष्टाचं मोल हे राख रं
नको विसावा नको ती झोप रं
जिवाचा मैतर ढवळ्या न्‌ पवळ्या, शेताला घेऊन चालरं

S - Dattaram Ghule दत्ताराम घुले

No comments:

Post a Comment