कितीक हळवे कितीक सुंदर Kitik Halave Kitik Sundar


कितीक हळवे, कितीक सुंदर, किती शहाणे अपुले अंतर
त्याच जागी त्या येऊन जाशी माझ्यासाठी माझ्या नंतर

अवचित कधी सामोरे यावे
अन्‌ श्वासांनी थांबून जावे
परस्‍परांना त्रास तरीही परस्‍परांविण ना गत्‍यंतर

मला पाहुनी दडते, लपते
आणिक तरीही इतुके जपते
वाटेवरच्या फुलास माझ्या लावून जाते हळूच अत्‍तर

भेट जरी ना या जन्‍मातून
ओळख झाली इतकी आतून
प्रश्‍न मला जो पडला नाही, त्याचेही तुज सुचते उत्‍तर

मला सापडे तुझे तुझेपण
तुझ्याबरोबर माझे मीपण
तुला तोलुनी धरतो मी अन्‌ तूही मजला सावर सावर

मेघ कधी हे भरून येता
अबोल आतून घुसमट होता
झरते तिकडे पाणी टपटप आणि इकडे शाई झरझर



Lyrics - Sandeep Khare  संदीप खरे
Music - Salil Kulkarni सलील कुलकर्णी
Singer - Salil Kulkarni सलील कुलकर्णी ,  Sandeep Khare संदीप खरे
Album - Namajoor  नामंजूर

No comments:

Post a Comment