सुखद या सौख्याहुनि वनवास
राजगृही या सौख्य कशाचे, सौख्याचा आभास ॥
गोदातटीची पंचवटी ती, आठवते मज पर्णकुटी ती
प्रिय रघुनंदन, प्रिय जानकी, एकामेका जवळ सारखी
कपोत युगुलापरी लाभला रात्रंदिन सहवास ॥
येथ घेरिती तया प्रजाजन
दुरावती मज जानकी-जीवन
भरजरी वसने, रत्नकंकणे, असह्य मज ही राजभूषणे
रावणसे हे राज्ञीपद का कारण हो विरहास ॥

No comments:
Post a Comment