सांवळाच रंग तुझा पावसाळी नभापरी
आणि नजरेत तुझ्या वीज खेळते नाचरी !
सांवळाच रंग तुझा चंदनाच्या बनापरी
आणि नजरेत तुझ्या नाग खेळती विखारी !
सांवळाच रंग तुझा गोकुळिच्या कृष्णापरी
आणि नजरेत तुझ्या नित्य नांदते पावरी !
सांवळाच रंग तुझा माझ्या मनी झाकळतो
आणि नजरेचा चंद्र पाहू केव्हा उगवतो ?
सांवळाच रंग तुझा करी जिवा बेचैन
आणि नजरेत तुझ्या झालो गडी बंदीवान !
आणि नजरेत तुझ्या वीज खेळते नाचरी !
सांवळाच रंग तुझा चंदनाच्या बनापरी
आणि नजरेत तुझ्या नाग खेळती विखारी !
सांवळाच रंग तुझा गोकुळिच्या कृष्णापरी
आणि नजरेत तुझ्या नित्य नांदते पावरी !
सांवळाच रंग तुझा माझ्या मनी झाकळतो
आणि नजरेचा चंद्र पाहू केव्हा उगवतो ?
सांवळाच रंग तुझा करी जिवा बेचैन
आणि नजरेत तुझ्या झालो गडी बंदीवान !
No comments:
Post a Comment