सांजवात लाविते,Sanjvat Lavite

सांजवात लाविते
आई, स्मरण तुझे होते

मिटल्या नयनी तुझीच मूर्ती
येउन सांगे शुभंकरोती
गहिवरुनी अश्रू म्हणती
भरचुड्याचे कर जोडिते

सुखी संसारी, तुझ्या कृपेने
कौतुक करण्या नाहीस तू पण,
पोरकीच ना आता तुजविण
लेक लाडकी हाक मारिते

बघण्या तुजला एकदाच ते
माहेराला चालत येते
कुशीत शिरूनी आई म्हणते
भीक घाल तू मातृदेवते

No comments:

Post a Comment