सांभाळ दौलत सांभाळ,Sambhal Dauat Sambhal

येड्या मानसा जपून चाल, देव सांगतो सांज सकाळ
सांभाळ दौलत सांभाळ अरं ही दौलत सांभाळ

ह्यो यज्ञ मांडला कर्मा संगती धर्माचा ..... ह्यो धर्माचा
ह्यो वारा गातोय मंतर हरीच्या नामाचा ..... ह्यो नामाचा
कुणी राकुस येता बाण सुटावा रामाचा ..... हो रामाचा
पाप मरावं पुण्य उरावं दुनिया ऱ्हाईल खुशाल
सांभाळ दौलत सांभाळ अरं ही दौलत सांभाळ

ह्ये माणिक मोती तालावरती डुलत्यात ..... आहा
ह्ये रान पाचूचं बघून डोळं दिपत्यात ..... आहा
ही आतुर झाली पिकं, जाऊ द्या पोटात भुकेल्या पोटात
त्यागावरती सारी जगतील अन्नब्रम्हाची कमाल
सांभाळ दौलत सांभाळ अरं ही दौलत सांभाळ

पानी सुटंल तोंडाला भूमी होईल अनावर ..... बा अनावर
ही बाग देवाची, तुडवा करतिल जनावरं ..... का जनावरं
जीव जगण्यापायी जल्म घेतो जगावर
माया द्यावी ममता घ्यावी सुखाचा होईल सुकाळ
सांभाळ दौलत सांभाळ अरं ही दौलत सांभाळ

No comments:

Post a Comment