सांज आली दूरातून,Sanj Aali Duratun

सांज आली दूरातून, क्षितिजाच्या गंधातून !

मनी नकार दाटले, हात हातीचे सुटले
मागे वळून पाहता शब्दभाव सर्व पुसले
आले जीवन काळोखे सारे समोर दाटून !

कळी कळी वेचताना अशी संध्याकाळ झाली
घराकडे वळणारी वाट अंधारी बुडाली
नामरूपहीन वृक्ष उभे भीती पांघरून !

आत बाहेर घेरून आल्या घनदाट छाया
चुकलेल्या गुरापरि जीव लागे हंबराया
कळी कळी वेचताना वेळ गेलीसे टळून !

No comments:

Post a Comment