सांगू कशी प्रिया मी,Sangu Kashi Priya Mi

सांगू कशी, प्रिया, मी माझे मला कळेना
हळुवार भावना ही शब्दांस आकळेना

एकांत आगळा हा, ही वेगळीच रात
चाहूल काय बाई, बाहेर की मनात
संकोच लाजरीचा अजूनी कसा ढळेना

लज्जा अबोल झाली, डोळेच बोलु दे, रे
अपुरा अधीर श्वास हृदयास तोलु दे, रे
उकलून पाकळी ये परि, फूल हे फुलेना

नवखा तुझ्यापरी मी नवखी मनात धुंदी
माझ्यातुझ्या सभोवती भरले धुके सुगंधी
मधुरात मीलनाची फिरुनी अशी मिळेना

No comments:

Post a Comment