संपली कहाणी माझी संपली कहाणी !
धुंद चांदण्या त्या राती संगतीस होती प्रीती
स्वप्नभारल्या जीवाला आस मीलनाची होती
आस लोपली ती आता, म्लान रातराणी !
मुके पाखरू ये कोणी प्रेमशून्य माझ्या गेही
लळा लावुनी का ऐसा उडुन आज जावे तेही ?
बाहुलीविना त्या दृष्टी अंध दीनवाणी !
अर्थहीन जीवन झाले प्रेमबंध तुटता सारे
दिशांतून घेरित आले क्रूर वादळाचे वारे
विना किनाऱ्याची राहे रात ही दिवाणी !
धुंद चांदण्या त्या राती संगतीस होती प्रीती
स्वप्नभारल्या जीवाला आस मीलनाची होती
आस लोपली ती आता, म्लान रातराणी !
मुके पाखरू ये कोणी प्रेमशून्य माझ्या गेही
लळा लावुनी का ऐसा उडुन आज जावे तेही ?
बाहुलीविना त्या दृष्टी अंध दीनवाणी !
अर्थहीन जीवन झाले प्रेमबंध तुटता सारे
दिशांतून घेरित आले क्रूर वादळाचे वारे
विना किनाऱ्याची राहे रात ही दिवाणी !
No comments:
Post a Comment