साजणी सई ग,Sajani Sai Ga

साजणी सई ग !
साजण नाही घरी, सुकली जाई ग !

दिस गेले किति सखा दूर देशी गेल्याला
पुशीते मी आसू त्याच्या रेशमी शेल्याला !
सोन्याच्या ताटामध्ये पक्वान्ने पाच ग !
सख्याच्या आठवाने घास जाईना ग !

चंदनी झोपाळा बाई हलतो ग डुलतो
भरजरी पदराचा शेव मागे झुलतो
पदराला आठवते सखयाची बोली ग !
ऐकताना होते माझी पापणी ओली ग !

No comments:

Post a Comment