साडी दिली शंभर,Sadi Dili Shambhar

झाली बहाल मर्जी सख्याची
साडी दिली शंभर रुपयांची

साडी डाळिंबी हीच मी लेईन
अशी मलाच आयन्यात पाहीन
अशी चालन, अशी उभी राहीन
चारचौघांत नाही सांगायची

त्यांची माझी प्रीत चोरटी
गूज झाकून ठेवीन पोटी
हसू कोंडून धरीन ओठी
दृष्ट लागल आयाबायांची

संधी साधून ओढ्याकाठी
त्यांची एकांती घेईन भेटी
तेव्हा प्रीतीच्या बोलीन गोष्टी
आडपडदा नाही ठेवायची

No comments:

Post a Comment