विझले रत्‍नदीप नगरात,Vijhale Ratnadeep Nagarat

विझले रत्‍नदीप नगरात
आता जागे व्हा यदुनाथ !

अंधारातुनि प्रकाश निवळे
हलके हलके पूर्वा उजळे
दवबिंदूंचे मोती झाले पर्णांच्या तबकात !

जागी झाली सुर्वणनगरी
अरुणासह ये उषासुंदरी
सोन्याची नवप्रभा पसरली, सोन्याच्या दारात !

No comments:

Post a Comment