वेदमंत्राहून आम्हा,Ved Mantrahun Aamha

वेदमंत्राहून आम्हा वंद्य वंदे मातरम्‌
वंद्य वंदे मातरम्‌

माउलीच्या मुक्ततेचा यज्ञ झाला भारती
त्यात लाखो वीर देती जीविताच्या आहुती
आहुतींनी सिद्ध केला, मंत्र वंदे मातरम्‌

याच मंत्राने मृतांचे राष्ट्र सारे जागले
शस्त्रधारी निष्ठुरांशी, शांतीवादी झुंजले
शस्त्रहीना एक लाभे मंत्र वंदे मातरम्‌

निर्मीला हा मंत्र ज्यांनी आचरीला झुंजुनी
ते हुतात्मे देव झाले स्वर्गलोकी जाउनी
गा तयांच्या आरतीचे गीत, वंदे मातरम्‌

1 comment: