वारा फोफावला,Vara Phophavala

वारा फोफावला, दरिया उफाळला
माझं ग तारू, कसं हाकारू
सजणे समिंदरात ?

लाटेवर लाट, पाठोपाठ
थयथय दरिया, नाचे काठोकाठ
तुफानाची खुणगाठ !

वाऱ्यानं शीड करी फडाफडा
छातीत होई धडाधडा
माझी काय छाती नाय्‌ वल्हवायला !

हे बघ कललं उजवीकडं
क्षणात झुकलं डावीकडं
फेसाळ पाणी होडीत आलं, थोडं थोडं !

No comments:

Post a Comment