शेत बघा आलंया,Shet Bagha Aalaya

शेत बघा आलंया राखणीला
सोन्याचं घुंगरू गोफणीला

लखलख पाचूचा हिरवा वाडा
रोखलाय वाऱ्यानं तेजाचा घोडा
गव्हल्या गाईचा अवखळ पाडा
धन्यानं बांधलाय्‌ दावणीला

मोत्याची नथणी मराठमोळी
लज्जेची लेणी अंगभर ल्याली
सोन्याच्या पाऊली लक्षुमी आली
राहिली जन्माची चाकरीला

एकीच्या सुखाला लावताय पिडा
पाखरांनो उडा नजरेत दडा
गोफणीत घुमतोय विषारी खडा
नका गणू गुजावण देखणीला

No comments:

Post a Comment