शेपटीवाल्या प्राण्यांची पूर्वी भरली सभा,
पोपट होता सभापती मधोमध उभा.
पोपट म्हणाला, पोपट म्हणाला, "मित्रांनो,
देवाघरची लूट, देवाघरची लूट !
तुम्हा-आम्हा सर्वांना एक एक शेपूट
या शेपटाचे कराल काय ?"
गाय म्हणाली, "अश्शा अश्शा, शेपटीने मी वारीन माश्या."
घोडा म्हणाला, "ध्यानात धरीन, ध्यानात धरीन
मीही माझ्या शेपटीने, असेच करीन, असेच करीन,"
कुत्रा म्हणाला, "खुषीत येईन तेव्हा, शेपूट हलवीत राहीन."
मांजरी म्हणाली, "नाही ग बाई, कुत्र्यासारखे माझे मुळीच नाही,
खूप खूप रागवीन तेंव्हा शेपूट फुगवीन, शेपूट फुगवीन."
खार म्हणाली, "पडेल थंडी तेव्हा माझ्या शेपटीची मलाच बंडी."
माकड म्हणाले, "कधी वर, कधी बुडी, शेपटीवर मी मारीन उडी."
मासा म्हणाला, "शेपूट म्हणजे दोन हात, दोन हात
पोहत राहीन प्रवाहात, पोहत राहीन प्रवाहात."
कांगारू म्हणाले, "माझे काय?"
"तुझे काय? हा हा हा !
शेपूट म्हणजे पाचवा पाय."
मोर म्हणाला, "पीस पीस फुलवुन धरीन, मी धरीन
पावसाळ्यात नाच मी करीन."
पोपट म्हणाला, "छान छान छान!
देवाच्या देणगीचा ठेवा मान.
आपुल्या शेपटाचा उपयोग करा."
"नाही तर काय होईल?"
"दोन पायाच्या माणसागत, आपुले शेपूट झडून जाईल."

No comments:
Post a Comment