मर्जी तुमची मी सांभाळीन, हृदयी द्या आसरा
सख्या हो, आज मला सावरा !
स्वप्नांचा हा मंचक सजला
धुंद सुगंधी होऊन भिजला
राहू कशी मी दूर साजणा
जवळी घ्या ना जरा
सख्या हो, आज मला सावरा !
हळू जरासा घाला विळखा
जीव होऊ दे हलका हलका
गोड गुलाबी उठता काटा
मोहरले दिलवरा
सख्या हो, आज मला सावरा !
चालू कशी मी बोलू कशी
मनातले मन खोलू कशी
मुकी असूनही गाते गाणे
माझ्या गुलमोहरा
सख्या हो, आज मला सावरा !
सख्या हो, आज मला सावरा !
स्वप्नांचा हा मंचक सजला
धुंद सुगंधी होऊन भिजला
राहू कशी मी दूर साजणा
जवळी घ्या ना जरा
सख्या हो, आज मला सावरा !
हळू जरासा घाला विळखा
जीव होऊ दे हलका हलका
गोड गुलाबी उठता काटा
मोहरले दिलवरा
सख्या हो, आज मला सावरा !
चालू कशी मी बोलू कशी
मनातले मन खोलू कशी
मुकी असूनही गाते गाणे
माझ्या गुलमोहरा
सख्या हो, आज मला सावरा !
No comments:
Post a Comment