सख्या रे घायाळ मी,Sakhya Re Ghayal Mi

हा महाल कसला रानझाडी ही दाट
अंधार रातिचा, कुठं दिसंना वाट
कुण्या द्वाडानं घातला घाव
केलि कशी करणी ?
सख्या रे, घायाळ मी हरिणी

काजळकाळी गर्द रात अन्‌ कंप कंप अंगात
सळसळणाऱ्या पानांनाही रातकिड्यांची साथ
कुठं लपू मी, कशी लपू मी, गेले भांबावुनी

गुपित उमटले चेहऱ्यावरती, भाव आगळे डोळ्यांत
पाश गुंतले नियतीचे रे तुझ्या नि माझ्या भेटीत
कुठं पळू मी, कशी पळू मी, गेले मी हरवुनी

No comments:

Post a Comment