सखी मी दर्ददिवाणी,Sakhi Mi Dard Diwani

सखी मी दर्ददिवाणी
माझी व्यथा कुणा न कळे ग

घायाळाची मर्मवेदना घायाळास कळे ग

रत्‍नपारख्याविण रत्नांची कुणा न पारख व्हावी
शूलावर मम शेज सखे जर नीज कशी मज यावी
गगन मंडळी शेज प्रियाची मीलन मग कोठे ग

फिरते वणवण जखमी होवून वैद्य कुणी न भेटे ग
मीरेची संपेल व्यथा जर हरीस वैद्य मिळे ग

No comments:

Post a Comment