लहानपण देगा देवा,Lahanpan Dega Deva

लहानपण दे गा देवा ।
मुंगी साखरेचा रवा ॥१॥

ऐरावत रत्‍न थोर ।
त्यासी अंकुशाचा मार ॥२॥

जया अंगी मोठेपण ।
तया यातना कठीण ॥३॥

तुका म्हणे बरवे जाण ।
व्हावे लहानाहून लहान ॥४॥

महापूरे झाडे जाती ।
तेथे लव्हाळ वाचती ॥५॥

8 comments:

  1. खूप दिवसांनी ऐकलो। मस्त वाटलं। राम कृष्ण हरी।

    ReplyDelete
  2. मस्त वाटलं,छान अभंग आहे.

    ReplyDelete
  3. महापूरे झाडे जाती ।
    तेथे लव्हाळ वाचती ॥५॥

    हे कुठून शोधले...संदर्भ मिळेल का?

    ReplyDelete
    Replies
    1. गाथ्यात तर हे नाही ....

      Delete
    2. Ganyaat aahe ki

      Delete
  4. राम कृष्ण हरी

    ReplyDelete
  5. सुंदर

    ReplyDelete