लागे ना रे थांग तुझ्या,Lage Na Re Thang Tujhya

लागे ना, लागे ना रे, थांग तुझ्या हृदयाचा
शांत किनाऱ्यापरी पाहसी खेळ धुंद लहरींचा

कितीक लाटा धावत येती, अपुले हितगूज सांगु पाहती
भाव तुझ्यापरी मुद्रेवरती अबोल पाषाणाचा

तुला न दिसते, तुला न कळते, तुझ्यात किती मी रंगून जाते
धरशील का रे माझ्या संगे सूर प्रेमगीताचा

प्रेमभावना क्षणाभराची भूलच केवळ माझी-तुमची
दोन पाखरं दुरावयाची काय नेम दैवाचा