रुसला मजवरती कान्हा,Rusala Majavarati Kanha

रुसला मजवरती कान्हा, रुसला मजवरती
गोकुळचा शिरजोर चोर ग, सापडला हाती

लोण्याचा गोळा कुणी पळविला, मांजरीवरी आळ घेतला
बिंग फोडिले तुझे म्हणूनी, रुसशी मजवरती

रुसूबाई रुसू, कोपऱ्यात बसू, बघता येते खुदकन हसू
गाल फुगवुनी पुन्हा गुलामा, रुससी मजवरती

थांब तुला मी अता पकडते, चोर पकडुनी सजाच देते
लोणी खावे, दूधही प्यावे, असे बोलता नयने लाजती

No comments:

Post a Comment