रूपसुंदर सखी साजिरी गुणखणी
दूर जाता उरे काय या जीवनी ?
पाहु कोठे अता मोहना ती प्रिया ?
शांतवू मी कसा विकल हृदयास या ?
प्रीतिसुम लोपले एकदा उमलुनी !
हरपली माधुरी, संपली चारुता
राहिली व्यापुनी अंतरा शून्यता
आज वीणेवरी मूक हो रागिणी !
रमविती ना जिवा रम्य संध्याउषा
काय मजला अता पौर्णिमेची निशा ?
आग ओली झरे शीत ज्योत्स्नेतुनी !
दूर जाता उरे काय या जीवनी ?
पाहु कोठे अता मोहना ती प्रिया ?
शांतवू मी कसा विकल हृदयास या ?
प्रीतिसुम लोपले एकदा उमलुनी !
हरपली माधुरी, संपली चारुता
राहिली व्यापुनी अंतरा शून्यता
आज वीणेवरी मूक हो रागिणी !
रमविती ना जिवा रम्य संध्याउषा
काय मजला अता पौर्णिमेची निशा ?
आग ओली झरे शीत ज्योत्स्नेतुनी !
No comments:
Post a Comment