रिकामी सांजंची घागर,Rikami Sanjachi Ghagar

रिकामी सांजंची घागर
हरिणीच्या दारात वाघरं
मनी पेटलं काहूर
खुडून टाकला अंकूर
चालला देवीचा जागर
रिकामी सांजंची घागर

डोळ्यांमंदी मावंना सागर
सागराच्या पायी खोल वावर
भरलं भरलं आभाळ
हरलं नशिब हरलं
मनी पेटलं काहूर
खुडून टाकला अंकूर
चालला देवीचा जागर
रिकामी सांजंची घागर

काळजाला सुटलाय्‌ गहिवर
मातीचा बी आटलाय्‌ पाझर
फुटलं फुटलं बाशिंग
सरलं जगणं सरलं
मनी पेटलं काहूर
खुडून टाकला अंकूर
चालला देवीचा जागर
रिकामी सांजंची घागर

No comments:

Post a Comment