राधा गौळण करिते,Radha Gaulan Karite

राधा गौळण करिते मंथन
आविरत हरिचे मनात चिंतन

सुवर्ण चंपक यौवन कांती
हिंदोलत ती मागे पुढती
उजव्या डाव्या झुलत्या हाती
कृष्ण कृष्ण ते बोलत कंकण

नाद मुरलीचा पडता कानी
बावरली ती गोकुळ हरिणी
छुमछुम छंदी घुंगूर चरणी
गुणगोविंदी गेली रंगून

राधेविण ते मंथन चाले
नवल बघाया नवनित आले
ध्यान तियेचे उघडी डोळे
दृष्टी पुढती देवकीनंदन

No comments:

Post a Comment