रात आज धुंदली,Raat Aaj Dhundali

रात आज धुंदली, प्रीत आज रंगली
मन वेडे गुंतले आज तुझ्या कुंतली

चंद्र वदनी झाकसी मेघ तरल सावळे
लाल अधर मखमली अमृतात नाहले
गंध नाचरी उभी तरल ही चाफेकळी

टिपुन तूच घेतले चांदणे नभातले
रातराणी आज ही बहरली तुझ्यामुळे
चांदणी झुरे मनी मुग्ध पाहुनी खळी
प्रीत आज रंगली !

लाजरे गुलाब दोन गालांवर लाजले
रंग-कुंचल्याविना चित्र कसे साधले
अमूर्त काय कल्पना मूर्त आज या स्थली
प्रीत आज रंगली !