रात चांदणी गंध चंदनी,Raat Chandani Gandha

रात चांदणी, गंध चंदनी, आज लोचनी, हवास तू
रात चांदणी, गंध चंदनी, आज लोचनी, हवीस तू

नकोस पाहू, नकोस ऐकू, प्रीतीचे हितगूज फुला
नयन बोलु दे, नयन ऐकु दे, आळवु दे अनुराग मला
धुंद छेडुनी, विरहरागिणी, सूर बंधनी, हवास तू

सहज बोलले, उगिच हसले, आणि विसरले मीच मला
काही न कळले, अंतर सरले, जीव अचानक मोहरला
लाज-लाजुनी, एक चांदणी, बोलली मनी, हवास तू

मिटुन पापणी, घेता सजणी, जाणवते का जाग उरी
चंद्र दर्पणी, तुला पाहुनी, लाज कशाला या अधरी
स्वप्न मीलनी, चित्त कोंदणी, आज चिंतनी, हवास तू

No comments:

Post a Comment