रचिल्या ऋषिमुनींनी,Rachilya Rushi Munini

रचिल्या ऋषिमुनींनी ज्याच्या ऋचा अनंत
डंका विनायका रे झडतो तुझा दिगंत

वरदायका गणेशा, महदाशया सुरेशा
का वेध लाविसी तू हेरंब एकदंत

येसी जळातुनी तू, कोणा कळे न हेतू
अजुनी भ्रमात सारे योगी-मुनी-महंत

मढ मंदिरात येती जे जे अन्यन्य भक्त
ते सर्व भाग्यवंत होतात पुण्यवंतNo comments:

Post a Comment