मूर्त रूप जेथे ध्यान श्रीपतीचे
पंढरीला लाभे भाग्य वैकुंठीचे
धुंडीत शोधित सख्या पांडुरंगा
भक्ति होऊनीया आली चंद्रभागा
तीर्थ रोज घेता देवचरणांचे
उजळे पावित्र्य जिच्या जीवनाचे
मायपित्याच्या प्रेमाचा पाईक
पंढरीला येता पुत्र पुंडलीक
वेड लागोनि त्या भक्तदर्शनाचे
वीटेवरी उभे द्वैत विठ्ठलाचे
आषाढीला होता वैष्णवांची दाटी
नाम प्रलयात बुडे सर्व सृष्टी
युगे अठ्ठावीस बाळ देवकीचे
जोजवीत जेथे पान पिंपळाचे
पंढरीला लाभे भाग्य वैकुंठीचे
धुंडीत शोधित सख्या पांडुरंगा
भक्ति होऊनीया आली चंद्रभागा
तीर्थ रोज घेता देवचरणांचे
उजळे पावित्र्य जिच्या जीवनाचे
मायपित्याच्या प्रेमाचा पाईक
पंढरीला येता पुत्र पुंडलीक
वेड लागोनि त्या भक्तदर्शनाचे
वीटेवरी उभे द्वैत विठ्ठलाचे
आषाढीला होता वैष्णवांची दाटी
नाम प्रलयात बुडे सर्व सृष्टी
युगे अठ्ठावीस बाळ देवकीचे
जोजवीत जेथे पान पिंपळाचे
No comments:
Post a Comment