मी तर आहे मस्त कलंदर,Mi Tar Aahe Mast Kalandar

जे जे सुंदर ते माझे घर
मी तर आहे मस्त कलंदर,
मस्त कलंदर !

अडलेल्यांना देतो हात
एकाकाची करितो साथ
सुखदु:खी मी शांत राहतो
पुढेच जातो, गाणी गातो,
श्रमुन कमवितो माझी भाकर
मी तर आहे मस्त कलंदर,
मस्त कलंदर !

जीवन म्हणजे केवळ वाट
केव्हा उतरण केव्हा घाट
ध्येय ध्येयसे वाटे लोका
चुकुन लाभते कोणा एका,
म्हणून चालतो असा निरंतर
मी तर आहे मस्त कलंदर,
मस्त कलंदर !

सह पथिकांनो डरता काय
उगीच डोळे भरता काय
चाले त्याचे भाग्य चालते
थांबे त्याचे दैव थांबते,
उचला पाऊल उचला सत्वर
मी तर आहे मस्त कलंदर,
मस्त कलंदर !

No comments:

Post a Comment