मी भीक मागणारी, दातार तू उदार
झोळीत टाकलासी का शेवटी नकार
मज आस आसऱ्याची, आश्वासिलेस तूही
होकार तोच आता गर्जे कठोर "नाही"
कुरवाळुनी कशाला केलास हा प्रहार
राजीव लोचनांच्या मी पिंजऱ्यात होते
डोळ्यांत भाव भोळा, ओठांत गोड गीते
पाळीव पाखराची केलीस का शिकार
आता कुठे फिरू मी? पंखात जोम नाही
सारे दिले तुला मी, मज राहिले न काही
एका तुझ्याविना हे जग पेटले शिवार
झोळीत टाकलासी का शेवटी नकार
मज आस आसऱ्याची, आश्वासिलेस तूही
होकार तोच आता गर्जे कठोर "नाही"
कुरवाळुनी कशाला केलास हा प्रहार
राजीव लोचनांच्या मी पिंजऱ्यात होते
डोळ्यांत भाव भोळा, ओठांत गोड गीते
पाळीव पाखराची केलीस का शिकार
आता कुठे फिरू मी? पंखात जोम नाही
सारे दिले तुला मी, मज राहिले न काही
एका तुझ्याविना हे जग पेटले शिवार
No comments:
Post a Comment