मी नाही कुणाची, नाही कुणाची
मी आज बहिण हो भावाची
मायपित्यांची पूजा करिते
चरणधूळ ही भाळी लाविते
हात जोडुनि क्षमा मागते
लेक नव्हे मी तुमची
अमृत ज्योति नयनी लाविन
डोळे भरुनि तुजला पाहिन
देवाआधी तुज ओवाळिन
पंचारती प्राणांची
जन्मोजन्मी तुझाच ताई
असा धाकला होऊन भाई
नको भेट रे याहून काही
मजला भाऊबीजेची
मी आज बहिण हो भावाची
मायपित्यांची पूजा करिते
चरणधूळ ही भाळी लाविते
हात जोडुनि क्षमा मागते
लेक नव्हे मी तुमची
अमृत ज्योति नयनी लाविन
डोळे भरुनि तुजला पाहिन
देवाआधी तुज ओवाळिन
पंचारती प्राणांची
जन्मोजन्मी तुझाच ताई
असा धाकला होऊन भाई
नको भेट रे याहून काही
मजला भाऊबीजेची
No comments:
Post a Comment