मथुरेला कृष्ण निघाला,Mathurela Krishna Nighala

मथुरेला कृष्ण निघाला कंस भेटीला
दु:ख काळजाला, साऱ्या गोकुळाला

यशोदेस वाटे चिंता
दृष्ट झाली या भगवंता
कंस तुला लाविल बाळा दुष्ट सापळा
दु:ख काळजाला, साऱ्या गोकुळाला

जवळ जाऊनिया माता
लडिवाळ कुरवाळिता
माऊलिस समजावितो. श्याम सावळा
दु:ख काळजाला, साऱ्या गोकुळाला

No comments:

Post a Comment