मालवून टाक दीप चेतवून,Malavun Tak Deep

मालवून टाक दीप चेतवून अंग-अंग !
राजसा किती दिसांत लाभला निवांत संग !

त्या तिथे फुलाफुलांत, पेंगते अजून रात
हाय तू करू नकोस एवढ्यात स्वप्नभंग !

गारगार या हवेत, घेउनी मला कवेत
मोकळे करून टाक एकवार अंतरंग !

दूरदूर तारकात बैसली पहाट न्हात
सावकाश घे टिपून एक एक रूपरंग !

हे तुला कसे कळेल ? कोण एकटे जळेल ?
सांग, का कधी खरेच एकटा जळे पतंग ?

काय हा तुझाच श्वास ? दर्वळे इथे सुवास !
बोलरे हळू उठेल चांदण्यावरी तरंग !No comments:

Post a Comment