माणूस तुझे नाव,Manus Tujhe Naav

कशासाठी आटापिटी, कुठे तुझी धाव ?
माणूस तुझे नाव !

नाशवंत दौलतीची धरुनिया आस
भोळ्या-खुळ्या जीवांना का लावितोस फास
बाहेरचा चोर जरी घरामधे साव
माणूस तुझे नाव !

विकोनिया देव कोणी जगे भक्त खोटा
कसाबाला गाय विके कुणी तो करंटा
नारीच्या जीवावरी रंक बने राव
माणूस तुझे नाव !

तुझ्याहुनी जात बरी श्वान-मांजराची
इमानानं करती रे राखणी घराची
विसरलास वाट तुझी पुण्य तुझा गाव
माणूस तुझे नाव !

No comments:

Post a Comment