माना मानव वा,Mana Manav Va

माना मानव वा परमेश्वर मी स्वामी पतितांचा
भोगी म्हणुनी उपहसा मी योगी कर्माचा

दैवजात दुःखांनी मनुजा पराधीन केले
त्या पतितांचे केवळ रडणे मजला ना रुचले
भूषण रामा एक पत्‍नीव्रत मला नको तसले
मोह न मजला किर्तीचा मी नाथ अनाथांचा

रुख्मिणी माझी सौंदर्याची प्रकटे जणु प्रतिमा
किंचीत हट्टी परंतु लोभस असे सत्यभामा
तरीही वरितो सहस्त्र सोळा कन्या मी अमला
पराधीन ना समर्थ घेण्या वार कलंकाचा

कर्तव्याला मुकता माणूस, माणूस ना उरतो
हलाहलाते प्राशून शंकर देवेश्वर ठरतो
जगता देण्या संजीवन मी कलंक आदरीतो
वत्सास्तव मम ऊर फुटावा वत्सल मातेचा



No comments:

Post a Comment