मानिनी ! सोड तुझा अभिमान
रूप-संपदा दो दिवसांची
यौवनासवे सरावयाची
तिने होऊनी धुंद, करिसी का प्रणयाचा अपमान ?
चिरंजीविनी प्रेम-भावना
दूर करी जी मलिन वासना
मान लववुनी तिचा करी गे, सखये तू सन्मान
रूप-संपदा दो दिवसांची
यौवनासवे सरावयाची
तिने होऊनी धुंद, करिसी का प्रणयाचा अपमान ?
चिरंजीविनी प्रेम-भावना
दूर करी जी मलिन वासना
मान लववुनी तिचा करी गे, सखये तू सन्मान
No comments:
Post a Comment